बिल गेट्सच्या अर्थिक पाठिंब्याने सुरु झालेल्या कॅलिफोर्नियातील एका स्टार्टअपने हवा आणि पाण्याचा वापर करून लोणी तयार करण्याची एक अभूतपूर्व पद्धत विकसित केली आहे. या प्रक्रियेमध्ये हवेतून कार्बन डाय ऑक्साईड आणि पाण्यातून हायड्रोजन काढणे, त्यांना गरम करणे आणि फॅटी ऍसिड वेगळे करण्यासाठी त्यांचे ऑक्सिडायझेशन करणे समाविष्ट आहे, जे नंतर स्निग्धांशामध्ये परावर्तित केले जातात. या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे पारंपारिक लोण्याच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी कार्बन फूटप्रिंट असलेले दुग्ध-मुक्त लोणी मिळते.
दुधाशिवाय बनवलेल्या लोण्याच्यी तुम्ही कल्पना करू शकता का?. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्या आर्थिक पाठिंब्याने कॅलिफोर्नियातील एका स्टार्टअपने दुग्ध-मुक्त पर्याय तयार करण्यासाठी एक नाविन्यपूर्ण पद्धत विकसित केली आहे जी चवीमध्ये पारंपारिक लोण्यासारखीच आहे.
थर्मोकेमिकल प्रक्रियेचा वापर करून आईस्क्रीम, चीज आणि दूध ह्यांना दुग्ध-मुक्त पर्याय देण्यामध्ये “सेव्हर” ही स्टार्ट अप अग्रेसर आहे. हे तंत्र कार्बन डाय ऑक्साईड, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून स्निग्धांशाचे (Fat) रेणू तयार करते, ज्यामुळे नवीन दुग्ध-मुक्त लोणी तयार होते.
बिल गेट्स यांनी त्यांच्या वैयक्तिक ब्लॉग ‘गेट्सनोट्स’ मध्ये लिहिले आहे की,
हे कदाचित एखाद्या स्वप्नासारखे वाटेल, परंतु सेव्हर नावाची कंपनी (ज्यामध्ये मी गुंतवणूक केली आहे) ती पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे. सर्व स्निग्धांश कार्बन आणि हायड्रोजन अणूंच्या वेगवेगळ्या साखळ्यांपासून तयार होतात या वस्तुस्थितीपासून त्यांनी सुरुवात केली. मग ते प्राणी किंवा वनस्पतींचा समावेश न करता त्याच कार्बन आणि हायड्रोजन साखळ्या तयार करण्यासाठी निघाले. त्यांनी शेवटी एक प्रक्रिया विकसित केली ज्यामध्ये हवेतून कार्बन डाय ऑक्साईड आणि पाण्यातून हायड्रोजन घेणे, त्यांना गरम करणे आणि फॅटी ऍसिडस् वेगळे करण्यासाठी आणि नंतर स्निग्धांश तयार करण्यासाठी त्यांचे ऑक्सिडायझेशन करणे समाविष्ट आहे. याचा परिणाम म्हणजे दूध, चीज, गोमांस आणि वनस्पतीजन्य तेलांपासून आपल्याला मिळणारे वास्तविक स्निग्धांश रेणू. ही प्रक्रिया कोणतेही हरितगृह वायू (Green हौसे Gases) सोडत नाही आणि त्यात शेतजमिनीचा वापर होत नाही आणि पारंपारिक शेतीच्या एक हजारव्या भागापेक्षा कमी पाणी वापरले जाते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याची चव दूधापासून तयार झालेल्या लोण्यासारखीच आहे. “
बिल गेट्स
मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर कमी करण्याचे पर्यावरणीय फायदे महत्त्वपूर्ण आहेत, कारण पशुधन उत्पादन हे हरितगृह वायू उत्सर्जनात प्रमुख योगदान देते. सेवरचा लोणी पर्याय खूपच कमी कार्बन फूटप्रिंटचे आश्वासन देतो.
सेवरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कॅथलीन अलेक्झांडर यांनी स्पष्ट केले की कंपनी पूर्व-व्यावसायिक टप्प्यात आहे आणि नियामक मंजुरीवर काम करत आहे. तिची अपेक्षा आहे की किमान 2025 पर्यंत विक्री सुरू होणार नाही.
मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचे पर्याय वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत असताना, अनेकदा त्यांची चव कमी होते. अलेक्झांडर यांच्या मते,
आम्ही डझनभर लोकांबरोबर अनौपचारिक चव चाचण्या घेतल्या आहेत आणि व्यापारीकरण आणि प्रमाण वाढवण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना अधिक औपचारिक पॅनेल आयोजित करण्याची योजना आहे.”
कॅथलीन अलेक्झांडर, सेवर मुख्य कार्यकारी अधिकारी

ग्राहक या कृत्रिम स्निग्धांशाचा स्वीकार करतील की नाही हे आता आव्हान आहे. पारंपरिक दुग्धजन्य आणि मांसजन्य पदार्थांपासून नवीन पर्यायांकडे वळण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे कठीण असू शकते.
या उपक्रमाचे समर्थन करणारे बिल गेट्स यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलेः “प्रयोगशाळेत तयार केलेल्या स्निग्धांश आणि तेलांकडे वळण्याची कल्पना सुरुवातीला विचित्र वाटू शकते. परंतु आपली कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरीत्या कमी करण्याची त्यांची क्षमता अफाट आहे. सिद्ध तंत्रज्ञान आणि प्रक्रियांचा वापर करून, आपण आपली हवामानविषयक उद्दिष्टे साध्य करण्याच्या एक पाऊल पुढे जाऊ “.
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मते, दुग्धव्यवसाय आणि मांस व्यवसायासह पशुधन क्षेत्र जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनात 14.5% योगदान देते.